इंदिरा गांधींच्या नातवाचे पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |


 


मोदींनी भारताला जगात सन्मान मिळवून दिला असे वरुण गांधी म्हणाले


उत्तर प्रदेश : देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. माझ्या घरातील अनेक सदस्य या देशाचे पंतप्रधान राहिले, मात्र मोदींनी भारताला जो सन्मान मिळवून दिला तो आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जमले नाही, असे वरुण गांधी पीलीभीत येथे एका प्रचार सभेत म्हणाले.

 

वरुण गांधी सुल्तानपुरचे खासदार असून यावर्षी ते पीलीभीत येथून निवडणुकीला उभे आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधानाच्या कामाचे कौतुक करत त्यांचा मी सैनिक असून तुमची सेवा करणं हा माझा धर्म असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या कामाचा पाढा वाचताना ते म्हणाले, देशासाठी मोदींचे मोठे योगदान असून आपण अभिमानाने म्हणू शकतो की, असा पंतप्रधान आमच्याजवळ आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@