खुशखबर : आता नेटफ्लिक्सचे आठवड्याचे सब्स्क्रिप्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |




मुंबई : भारतात सध्या वेब मालिकांचे वारे वाहते आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉनसारख्या कंपन्या तग धरू लागल्या आहेत. वेब मालिकांच्या क्षेत्रात अनेक भारतीय कंपन्या उतरल्या असून मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना प्रत्येक कंपनी आखात आहेत. अशामध्ये आता नेटफ्लिक्सने नव्या प्रकारच्या प्लॅन्सद्वारे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या जाहीर केलेल्या प्लॅन्सनुसार ग्राहक आठवड्याच्या बिलिंगचा पर्याय निवडू शकतील. हा पर्याय फक्त मोबाइलवर पाहण्यासाठीच उपलब्ध असणार आहे.

 

असे असतील प्लॅन्स

 

· ६५ दर आठवडा मोबाइल ओन्ली प्लॅन

· १२५ दर आठवडा बेसिक प्लॅन (SD)

· १६५ दर आठवडा Standard Plan (दोन डिव्हाइसेस, HD)

· २०० दर आठवडा Ultra Plan (चार डिव्हाइसेस, 4K)

· सोबत २५० दर महिना मोबाइल ओन्ली या प्लॅनचीही चाचणी सुरु आहे

· सोबत एक महिना मोफत ट्रायल उपलब्ध.

 

मोबाइल ओन्ली प्लॅन्समध्ये ग्राहक फोन/टॅब्लेट यापैकी केवळ एक डिव्हाईस वापरू शकतील. यामध्ये HD/4K रेजोल्यूशनमध्ये कंटेंट पाहता येणार नाही. तसेच हा प्लॅन सुरु असताना लॅपटॉप/डेस्कटॉपवर नेटफ्लिक्स वापरता येणार नाही. हे प्लॅन्स सध्या चाचणी स्वरुपात असल्यामुळे सर्वांना दिसतीलच असे नाही याची नोंद घ्यावी. हे स्वस्त प्लॅन्स आल्यावरसुद्धा नेटफ्लिक्स भारतातील सर्वात महाग स्ट्रिमिंग सेवा आहे. अॅमेझॉनची प्राईम सेवा वस्तूंच्या डिलिव्हरीसोबत चित्रपट, गाणी, मालिका असं सर्वकाही उपलब्ध करून देत असल्यामुळे तो चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@