मतदान करणाऱ्यांसाठी मोफत जेवण, पेट्रोलवर सवलत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आता व्यापारी वर्गही पुढे सरसावला आहे. देशभर मतदानाच्या दिवसांमध्ये मतदार जागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

नोएडा येथील केमिस्ट असोसिएशनतर्फे मतदारांना औषधांवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांना मतदान केल्याचा पुरावा म्हणजे बोटावरील शाई दाखवावी लागेल. त्यानंतर ही सवलत मिळणार आहे. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनूप खन्ना यांनी मतदान करणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत देण्याची संकल्पना मांडली आहे.

मतदान करणाऱ्यांना 'दादी की रसोई' या हॉटेलमध्ये मोफत जेवणही दिले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केल्यावर या ठिकाणी मतदारांना मोफत जेवण दिले जाणार आहे. काही रुग्णालयांनीही या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. मतदारांना रुग्णालयात विविध उपचार व चिकित्सा आदींवर पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. नोएडा येथे ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूका होणार आहेत. यापूर्वी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशने (AIPDA) मतदान करणाऱ्यांना पेट्रोल-डिझेलवर सवलत देणार असल्याची घोषणा केली होती.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@