मनसेची मते भाजपलाच पडतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज ठाकरेंसह जे काही जनमत होते, तेही आता जाणार असून राज ठाकरेंसोबत गेलेली मंडळी हे मनाने हिंदुत्ववादी आहेत. एकेकाळचे ते शिवसेना आणि भाजपाचे मतदार आहेत. राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांचा मतदार, मनसेचा ते टक्के मतदार तुटलेला आहे. कारण सर्वांना मोदी सरकार पुन्हा हवे आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


राज यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस उघडी पडत आहे. कारण
, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळेच, काँग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही. राज ठाकरेंना महाआघाडीत घेतले तर बिहार आणि उत्तर प्रदेशात काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा आहे. त्यामुळे, राज ठाकरेंच्या सभा म्हणजे 'मान न मान मै तेरा मेहमान', अशा आहेत. राज ठाकरेंनी कितीही गरळ ओकली. तरी, त्यांच्या पक्षातील मोदी समर्थक आम्हालाच मतदान करतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. मावळमध्येही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणखी आठ ते दहा सभा घेणार आहेत. भाजपा नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी संधी देण्याची राज ठाकरेंची भूमिका शरद पवारांना तरी पटेल का, असा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विचारला. तर, मुख्यमंत्री फडवणीस यांनी राज यांच्या सभेचा भाजपालाचा फायदा होईल, असे म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@