पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भाजपचे संकल्प पत्र जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली :  लोकसभा  निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह भाजपच्या संकल्पपत्राची घोषणा केली. २०२० मध्ये या संकल्पातील ७५ संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार भाजपने ठेवला आहे. देश आज जगात सर्वाधिक बळकट अर्थव्यवस्था असल्याचा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. भाजपचा संकल्प हा देशाचा ७५ व्या स्वातंत्र्य दिनाला समर्पित करण्यात आला. भाजप सरकारने देशवासियांच्या मनात सुरक्षिततेची भावना जागृत केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.  

भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रातील प्रमुख मुद्दे

 

· १ लाखांवरील कृषिकर्जाला पाच वर्षांसाठी शुन्य टक्के व्याज

· ग्रामीण विकासासाठी पाच वर्षात २५ लाख कोटींचा निधी

· सर्व शेतकऱ्यांना सहा हजार प्रतिवर्ष मोबदला

· सर्व प्रलंबित सिंचन योजना पूर्ण करणार

· शेतकऱ्यांना पेन्शन सुविधा देणार

· राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार

· देशातील लहान दुकानदारांना साठ वर्षांनंतर पेन्शन योजना

· राष्ट्रवादाला प्राधान्य, दहशतवाद्यांच्याविरोधात कठोर कारवाई

· राम मंदिराची उभारणी करणार

· देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जागा वाढवणार

· प्रत्येकाला पक्के घर

· प्रत्येक घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर

· सौभाग्य योजनेतून सर्व घरांमध्ये वीज

· सर्व घरांमध्ये शौचालये पूरवण्याचा निर्धार

· राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची गती दुप्पट करणार

· कचरा निर्मूलनाद्वारे शून्य कचरा मोहिम राबवणार

· सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करणार

· प्रत्येक व्यक्तीला पाच किमी क्षेत्रात बॅंकींग सुविधा देणार

· डिजिटल इंडिया मोहिम आणखी व्यापक करणार

· आदिवासी सेनानींसाठी काम करणार

· सरकारी इमारतींची पूर्नरचनेचा आणि पूर्नविकास करणार

· महिला सशक्तीकरणावर भर

· राष्ट्रीय संग्राहालयांचे डिजिटलायझेशन करणार




माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@