'या'दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळवण्यात येणाऱ्या भारतीय संघाची घोषणा १५ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे या संघात कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला डच्चू दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात पुढील सोमवारी मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर संघाची घोषणा होईल.

 

या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतले सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत. पहिल्या फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जूनला मैदानात उतरणार आहे.

 

दोनदा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताचा संभाव्य संघ निश्चित मानला जात असला तरी, चौथ्या क्रमांकासाठी कोणत्या खेळाडूला संधी द्यावी, या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. या स्पर्धेत भारताची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेसोबत ५ जूनला होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@