होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-१४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



डॉ. हॅनेमान यांनी 'ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन' या ग्रंथातील समास क्र. ८३ मध्ये सांगून ठेवले आहे की, हॉमियोपॅथीक तपासणीच्या वेळी हॉमियोपॅथीक चिकित्सकाने पूर्वग्रहदूषित असता कामा नये व आपली सर्व ज्ञानेंद्रिये सजग ठेवावीत.


होमियोपॅथीच्या तत्त्वांचा व सिद्धांतांचा रुग्णाची सखोल माहिती घेताना केलेला कल्पक व तंत्रशुद्ध वापर म्हणजेच होमियोपॅथीक चिकित्सा किंवा केस टेकिंग. डॉ. हॅनेमान यांनी 'ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन' या ग्रंथातील समास क्र. ८३ मध्ये सांगून ठेवले आहे की, हॉमियोपॅथीक तपासणीच्या वेळी हॉमियोपॅथीक चिकित्सकाने पूर्वग्रहदूषित असता कामा नये व आपली सर्व ज्ञानेंद्रिये सजग ठेवावीत. याचे कारण असे की, रुग्णाच्या आजाराचे मूळ शोधून काढण्याची मोठी जबाबदारी ही चिकित्सकावर असते. होमियोपॅथीक तपासणी ही संपूर्ण क्रिया रुग्णाला समजून घेणे (Perceiving) व त्यांच्या चैतन्यशक्ती अभिव्यक्तीला सजजून घेण्याची क्रिया असते. होमियोपॅथीक चिकित्सक हा एखाद्या निष्णात, निपुण व कल्पक चित्रकाराप्रमाणे असतो. तो आजारी माणसाचे चित्र सर्व बारकाव्यांसह समजून घेतो व आजारी माणसाचे हुबेहूब चित्र रेखाटतो. याच्यासाठी त्याला अचूक निरीक्षणाची गरज असते. केस टेकिंगमध्ये चिकित्सकाला मुख्यत्वे शोधायचे असते ते 'आजारामध्ये नक्की काय बरे करायचे आहे.' हा प्रश्न जरा विचित्र वाटतो. आजारच बरा करायचा असतो. त्यामध्ये आणखीन काय शोधशयचे? परंतु, इथेच होमियोपॅथीमधील चिकित्सा जास्त प्रगल्भ व गहन ठरते. प्रत्येक रुग्णाची चैतन्यशक्ती ही तिच्या वैयक्तिक गुणधर्मानुसार लक्षणे निर्माण करत असते व ही दिसणारी लक्षणे आजारामध्ये फार महत्त्वाची असतात.

 

नुसती आजाराची लक्षणे पाहून औषध दिल्यास रुग्णाचा आजार मुळापासून बरा होत नाही. म्हणूनच रुग्णाच्या चैतन्यशक्तीने तयारी केलेली रुग्णाची स्वत:ची अशी लक्षणे जाणणे फार महत्त्वाचे असते. या सर्व लक्षणांनुसार, रुग्णाची एक स्थिती जी शारीरिक व मानसिक सहनशीलतेनुसार तयार होते, तिलाच 'प्राकृतिक स्थिती' म्हणजेच (State of Disposition) असे म्हटले जाते. ही सर्वसाधारण स्थिती प्राकृतिक स्थिती म्हणजेच माणसाच्या गाभ्याऱ्यात केंद्रस्थानी असलेला मुख्य अडथळा असतो व हा अडथळा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत रुग्णाचा आजार मुळापासून बरा होत नाही. या अडथळ्यालाच 'केंद्रीय अडथळा' किंवा 'Central Disturbance' असे म्हणतात. होमियोपॅथीचे ऋषितुल्य शिक्षक डॉ. सी. एम. बोगर यांनी सर्वप्रथम 'केंद्रीय अडथळा' संज्ञा वापरली. हा 'केंद्रीय अडथळा' शोधून काढणे हेच या होमियोपॅथीक तपासणीचे मुख्य उद्दिष्ट असते.

 

'केंद्रीय अडथळा' हा मुख्यते रुग्णाची मानसिक स्थिती, चेतना संस्था, संप्रेरकांचा समतोल आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्या अभ्यासाने शोधता येतो. यालाच 'PNEI AXIS' (Psycho-Neuro-Endocrino-Immunologie axis) असे म्हटले जाते. याची माहिती घेत असताना रुग्णाच्या सर्व लक्षणांचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये रुग्णांच्या आयुष्यातील स्थिती, शारीरिक स्थिती व प्राकृतिक स्थितीची माहिती चिकित्सकाला मिळते व नंतर प्रत्यक्ष आजाराची लक्षणे (Symptoms of pathological condition) घेतली जातात. होमियोपॅथीक चिकित्सा ही इतक्या खोलवर जाऊन गहनतेने व खूप प्रगल्भतेने आजारी माणसाचा विचार करते. इतक्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून क्वचितच कुठे व कोणी माहिती व अभ्यास करत असेल, सामान्य जनांना होमियोपॅथीची ही थोरवी माहीत नाही किंवा त्यांना सांगितली गेली नाही. वर्षानुवर्षे होमियोपॅथीबद्दल गैरसमज पसरवून खरी माहिती दाबली गेली. स्वत:च्या स्वार्थासाठी काही मंडळींनी व संस्थांनी लोकांना खऱ्या चिकित्सापद्धतीपासून लांब ठेवले. पुढील भागात आपण केस टेकिंगबद्दल अजून माहिती घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@