दीदींनी पश्चिम बंगाल केले गुंडांच्या हवाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019
Total Views |


 


कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये रविवारी कूच बेहार येथे निवडणुक प्रचारासाठी आले आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जींवर त्यांनी स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका केली. भाषणावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर 'दीदी जरा देख लो, और दिल्ली में बैठे हुए लोग भी जरा देख लो; ये कैसी लहर चल पडी है,' असा टोला मोदींनी लगावला.

 

'भाजप रॅलीला एवढी गर्दी पाहून काहींची झोप उडाली. तुम्ही जितके मोदी-मोदी म्हणून घोषणा द्याल, तेवढी आणखी लोकांची झोप उडेल. तुम्हाला माहीत आहे, ते कोण आहेत? त्या पश्चिम बंगालमधील 'स्पीड ब्रेकर' असलेल्या 'दीदी' आहेत. त्यांची झोप उडाली आहे. त्या त्यांचा राग त्यांचे अधिकारी आणि निवडणूक आयोगावर काढत आहेत,' असे मोदी म्हणाले.

 

'राजकारणात एखाद्याच्या पायाखालून जमीन सरकणे म्हणजे काय असते, हे समजून घ्यायचे असेल, तर या दीदींकडे पहा. त्यांची दीदींची चिडचिड, दीदींचा राग एवढ्यावरूनच समजून येईल. ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे ब्रीद ‘माँ-माटी-मानुष’ हे आहे. मात्र, पक्षाच्या धोरणांचे चित्र याउलट आहे. मतांच्या राजकारणासाठी दीदी 'माँ'ला (आईला) विसरून गेल्या आहेत. त्या भारताचे तुकडे-तुकडे करू इच्छिणाऱ्यांच्या बाजूने उभ्या आहेत. हा 'माँ'चा अपमान आहे.'

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@