फिर एक बार मोदी सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019
Total Views |



अधिकृत ऑडिओ-व्हिडिओ कॅम्पेनला सुरुवात

 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत ऑडिओ-व्हिडिओ कॅम्पेन आज जारी केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऑडिओ-व्हिडिओ कॅम्पेनची टॅगलाईन, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशी आहे. सदर कॅम्पेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केलेल्या अनेकविध कामांची, योजनांची माहिती देण्यात आली आहे. भाजपने यंदा, ‘काम करणारे सरकार, प्रामाणिक सरकार, मोठे निर्णय घेणारे सरकार,’ या तीन संकल्पनांवर प्रामुख्याने भर दिला आहे.

 

भाजपने जारी केलेल्या गीताचे बोल असे आहेत- ‘पाँच साल पहले, देश ने देखा था एक सपना! सबके साथ भी होता हो, विकास सबका अपना! चाचा-भतिजा कोई नही, बस काबिलियत से देश चले! फेक-वेक, फर्जी नहीं, बस सच्चाई से देश बढे! धीरे-धीरे काम न हो, जो हो तेज फटाफट हो! काले धन से जंग छिडे, गरीब का बेडा पार हो!’

 

कॅम्पेनमध्ये काय काय?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकवटलेल्या विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधत निर्णायक नेतृत्व विरुद्ध महाभेसळ या नावाने एक मीमदेखील तयार करण्यात आले आहे. भाजपने जारी केलेल्या व्हिडिओ आणि पत्रकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबविलेल्या अनेक योजनांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षा, भारताची वैश्विक ताकद, उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याने अंतराळातील भारताचे यश, दहशतवादाविरोधातील कारवाई, महिला सशक्तीकरण, माजी सैनिकांसाठीची वन रँक वन पेन्शन, स्वच्छ भारत अंतर्गत बांधलेली कोट्यवधी शौचालये, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, उज्ज्वला योजना, मध्यमवर्ग आणि तरुण कामगारांना दिलेली आयकरातील सूट, काळ्या पैशांविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांचाही या कॅम्पेनमध्ये समावेश आहे. शिवाय कॅम्पेन व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांची तुलना मच्छरांशी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@