'मेट्रो-३'चे सर्वात मोठे भुयार खणून पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019
Total Views |





प्रकल्पाच्या २३ किमी भुयाराचे काम मार्गी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गिकेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे भुयार शुक्रवारी खणून पूर्ण झाले. विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळापर्यंतचे २.९ किमी लांबीचे हे भुयार आहे. मेट्रो प्रकल्पातील हे आजवरचे दहावे भुयार आहे. ५२ किलोमीटरच्या संपूर्णपणे भुयारी मार्गिका असणाऱ्या या प्रकल्पाचे २३ किलोमीटरचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

भारतातील पहिल्या पूर्णपणे भुयारी असणाऱ्या मेट्रो-३ या प्रकल्पाचे काम सद्या शहरात वेगाने सुरू आहे. यामधील कुलाबा ते वांद्रे हा पहिला टप्पा डिसेंबर २०२१ पर्यंत कार्यान्वित करण्याचा 'मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन'चा प्रयत्न आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या भुयारीकरणाच्या कामासाठी १७ टीबीएम यंत्र शहाराच्या भूगर्भात कार्यरत आहेत. या प्रकल्पातील ९ भुयारे पूर्ण झाले असून दहावे भुयार शुक्रवारी पूर्ण झाले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात विद्यानगरी ( कलिना विद्यापीठ) येथील विवरातून भुयारीकरणाला सुरुवात केलेले गोदावरी हे टीबीएम यंत्र शुक्रवारी आंतरदेशीय विमानतळानजीकच्या विवरातून बाहेर पडले. या यंत्राने प्रतिदिन ६.५२ मीटर वेगाने भुयारीकरण करत ४५५ दिवसात भुयार खणण्याचे काम पूर्ण केले. महत्वाचे म्हणजे या मेट्रो प्रकल्पातील आतापर्यंतचे हे सर्वात लांब भुयार असून त्याची लांबी २.९ किमी आहे.

विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळादरम्यान भूगर्भात असणाऱ्या बेसाल्ट, ब्रेशिया अशा कठीण खडकांना भेदण्याचे काम 'गोदावरी-१' नामक यंत्राने केले. मेट्रो प्रकल्पातील आंतरदेशीय विमानतळ या स्थानकामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाशांना विमानतळ गाठणे सोयीचे ठरणार आहे. शिवाय या ठिकाणाहून नवी मुंबई विमानतळाकडे जाणारी मेट्रो मार्गिका देखील प्रस्तावित आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@