काँग्रेसची अवस्था डुबत्या टायटॅनिकसारखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019
Total Views |


 


नांदेड : काँग्रेसची अवस्था डुबत्या टायटानिकसारखी झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या सभेत केली. शरद पवार, प्रफुल्ल, राजीव सातव हे निवडणुकीला घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून पळ काढला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे उभे आहेत.

 

काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी समृद्ध आणि सुरक्षित अशा नवभारतासाठी पुन्हा एकदा एनडीएला मतदान करा, असे आवाहन जनसमुदायाला केले. मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण या नेत्यांवर चौफेर टीका केली.

 

"काँग्रेस नेतृत्वाची भंबेरी उडाली आहे. निवडणूक लढवण्यासाठी मायक्रोस्कोप घेऊन मतदारसंघ शोधावा लागला आहे. जिथे भारतातील बहुसंख्य अल्पसंख्यक आहेत तिथे हे महाशय लढताहेत. तिथे निघालेली मिरवणूक तुम्ही पाहिलीच असेल. सोशल मीडियावर या मिरवणुकीचे व्हिडिओ झळकलेत. त्यात काँग्रेसचा झेंडा शोधावा लागत आहे. काय अवस्था आहे ही काँग्रेसची?" असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@