राहुल गांधींच्या कार्यक्रमात मोदींचा जयजयकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |



 

पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील हडपसर मगरपट्टा सिटी येथे शुक्रवारी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे राहुल गांधींनी दिली. यावेळी राहुल गांधींनी एका प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताच मोदी मोदी अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आतातरी पराभव मान्य करा, अशी टीका भाजपकडून केली जात आहे.

 

 

 

आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुप प्रेम आहे. माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही, पण त्यांचा माझ्यावर राग आहे असे राहुल गांधींनी म्हणताच सभागृहात नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा नेते अमित मालविया यांनी व्हिडीओ ट्विट करत राहुल बाबा आता तरी पराभव मान्य करा असा टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचे सांगितले. वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले. यावेळी एअर स्ट्राईक, गरीबांच्या खात्यावर ७२ हजार जमा करण्यासाठीची योजना, रोजगार आदी मुद्द्यांवर राहुल गांधींनी चर्चा केली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@