पंतप्रधानांनी उलगडलं एअर स्ट्राईकच्या रात्रीचे रहस्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |




नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी योजना आखल्यावर नेमकं त्या रात्री काय घडलं, याची माहिती पंतप्रधानांनी अखेर उघड केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी ही मुलाखत दिली आहे.

 

नरेंद्र मोदी म्हणाले कि, "पाकला धडा शिकवण्यासाठी आम्ही तयारी करत होतो. आम्ही हा हल्ला केल्यावर पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही, सामान्य जनतेचे नुकसान न करता आम्हाला थेट दहशतवाद्यांना लक्ष्य करायचे होते. त्या दृष्टीने योजना आखण्यात आली होती. माझीही या सर्व कारवाईवर बारीक नजर होती. रात्री १ वाजता भारतीय वायुसेनेन पाकिस्तानाच्या सीमेत प्रवेश केला. आपले जवान जीव धोक्यात घालून ही कारवाई करणार होते, त्यामुळे ते परत येईपर्यंत कुणालाही झोप लागणार नव्हती."

 

एअर स्ट्राईकचे राजकारण करणाऱ्यांनाही नरेंद्र मोदींनी सुनावले. ते म्हणाले, "मी कधीच या स्तरावर येऊन राजकीय विचार करत हा निर्णय घेतलेला नाही. ज्या रात्री बालाकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात आला त्यावेळी मी पूर्ण लक्ष्य ठेवून होतो. जवान कोणत्यावेळी निघणार, हल्ला कधी होणार याची संपूर्ण माहीती मी घेतली होती. जवानांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर पहाटे ४ वाजता मोहीम फत्ते झाल्याचे समजले. जवान सुखरूप आल्यावर माझ्यासह साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला."

 

या कारवाईनंतर नरेंद्र मोदी आणि या कारवाईतील सहकारी सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही हालचाल झाली आहे का, त्यावर लक्ष्य ठेवून होते. पाचपर्यंत काहीच हालचाल दिसली नाही मात्र साडेपाच वाजता पाकिस्तानमध्ये एक ट्विट आल्यानंतर ही घटना घडल्याची पुष्टी पाकिस्तानातून मिळाली. त्यानंतर लगेच अधिकाच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. सकाळी वाजता पुढील नियोजनासाठी माझ्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट परिसरात दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले, अशी माहीती मोदींनी दिली आहे.

 

ज्या एअर स्ट्राईकच्या पुराव्यांबद्दल विरोधक विचारत आहेत, ते पुरावे सर्वात आधी पाकिस्तानने दिले. किती दहशतवादी ठार मारले हा संशय इथल्या लोकांनाच आहे. दहशतवादी मारल्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली होती. नेमकं भारताने काय केले हे सांगण्यासाठी पाकिस्तानला उघडपणे जगाला सांगता येणार नाही. माझे काम भारताच्या हिताचे रक्षण करणे आहे. आपलेचे नेते पुरावा मागत आहेत असा आरोप नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@