प्रगती पुस्तक खासदाराचे : कल्याण मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |



मत जातीला की विकासाला?

 

ठाणे शहराच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली शहरही विकसित व्हावे, अशी या ठिकाणच्या नागरिकांची इच्छा आहे. मात्र, यासाठी एक प्रगत व सुशिक्षित दृष्टिकोन असलेले नेतृत्व हवे की, एका विशिष्ट समाजातील, जातीतील चेहरा म्हणून मतदान करायचे, असा प्रश्न कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरिकांना पडला आहे. २००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले आणि त्यातून कल्याण लोकसभा मतदारसंघ उदयास आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत माजी खा. प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. मात्र, आनंद परांजपे यांनी २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या मतदार संघाला खा. डॉ. श्रीकांत शिंदे हा नवीन चेहरा लाभला. शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. श्रीकांत शिंदे हे एम. एस. ऑर्थोसर्जन आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील कामकाजात त्यांचा कल अधिक आहे. तसेच कल्याण ते ठाणे दरम्यान मध्य रेल्वेच्या विविध समस्यांबाबतही त्यांनी विशेष काम केले आहे.

 

 
 

ठाणे लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच सेना-भाजप युतीचे वर्चस्व राहिले आहे. आधी जनसंघ नंतर भाजपकडे असलेल्या या मतदारसंघातून १९७७ आणि १९८० ला रामभाऊ म्हाळगी, १९८१ च्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ ओपातील, १९८९ आणि १९९१ ला रामभाऊ कापसे यांनी विजय मिळवित बालेकिल्ला अबाधित राखला. १९८४ ला काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी कायम भाजपला साथ दिली. नंतर युतीच्या वाटाघाटीत ठाणे लोकसभा मतदार संघ सेनेच्या वाटेला आला. त्यात १९९६, १९९८, १९९९, २००४ असे सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले. २००९ च्या रचनेत कल्याण लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर प्रकाश परांजपे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनही आले परंतु, ते राष्ट्रवादीत गेले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र परांजपे यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१४ च्या निवडणुकीत सेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे तर मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती, मात्र, यावेळी आनंद परांजपेंना ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाल्याने कल्याण लोकसभेसाठी बाबाजी पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. बाबाजी पाटील हे ठाणे महापालिकेचे नगरसेवक आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील आगरी समाजाचे वर्चस्व पाहता बाबाजी पाटील यांच्याबाबत आगरी कार्ड वापरले जात आहे. तथापि, सुशिक्षितांचे शहर असलेल्या डोंबिवलीत मात्र डॉ. शिंदे यांनाच पसंती मिळत आहे.

 

विधानसभा मतदार संघाचा आढावा

 

कल्याण लोकसभेत कळवा-मुंब्रा-दिवा, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ अशा सहा विधानसभेच्या मतदारसंघांचा समावेश होतो. यात कळवा-मुंब्रा राष्ट्रवादी, कल्याण पूर्व भाजप, डोंबिवली-भाजप, कल्याण ग्रामीण शिवसेना, उल्हासनगर राष्ट्रवादी, अंबरनाथ शिवसेना

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@