ब्लॉगमध्ये नेमकं काय म्हणाले आडवाणी : वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पक्षाच्या स्थापना दिवस ६ एप्रिलच्या दोन दिवस आधी गांधीनगर लोकसभा मतदार संघातील येथील जनतेचे आभार मानले. या भागातून ते सहावेळा खासदार म्हणून निवडून आले होते. गांधीनगरमधून यापुढे आडवाणी निवडणूक लढवणार नाहीत, त्यानंतर पहिल्यांदाच एका ब्लॉगद्वारे त्यांनी आपले मत मांडले आहे. आम्ही राजकीय विरोधकांना कधी देशविरोधी मानले नाही, असे आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय पातळीवर वेगवेगळा अर्थ लावण्यात आला.

 

गांधीनगर लोकसभा मतदार संघातून लालकृष्ण आडवाणी हे सहावेळा खासदार राहीले आहेत. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. त्यापूर्वी त्यांनी ब्लॉगद्वारे आपल्या राजकीय प्रवासाविषयी आणि सिद्धांतांविषयी उल्लेख केला आहे. भाजपचे संस्थापक असलेल्या आडवाणी यांनी आपल्या राजकीय आयुष्यात सर्वात आधी देश आणि मग पक्ष, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर राजकीय पक्ष आधी मग स्वतः, असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यांनी लिहीलेल्या ब्लॉगमध्ये याचाच उल्लेख करत मी यावर कायम असल्याचे म्हटले आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना येणार्‍या लोकसभा निवडणुकांचे तिकीट दिले गेले नाही. अडवाणी ९१ वर्षांचे झाले आहेत आणि मुरली मनोहर जोशी ८५ वर्षांचे असल्याने पक्षातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाविषयीचा उल्लेख केला आहे. वयाच्या १४ वर्षी त्यांनी रा.स्व.संघामध्ये प्रवेश केला. या काळात त्यांनी जनसंघाच्या स्थापनेपासून ते भाजपच्या स्थापनेपर्यंत सुमारे ७० वर्षे ते राजकारणात विविध जबाबदाऱ्या पार पाडत सक्रीय होते. आडवाणी यांनी सर्व राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. लोकशाहीबद्दल बोलताना ते म्हणाले, 'भारतीय संविधानाचा आम्हाला आदर आहे. राजकीय विरोध करणाऱ्यांना आम्ही कधी देशविरोधी मानले नाही. त्यांना वेगळ्या विचारधारेचे मानले. मात्र, राजकीय विरोध करणाऱ्यांना देशविरोधी मानले नाही'.

 

आडवाणी म्हणाले, "भ्रष्टाचार निर्मुलनासाठी भारतीय जनता पक्ष हा कठोर भूमिका घेण्यात आघाडीवर आहे. आपल्या देशातील स्वायत्त संस्थांची स्वतंत्रता, निष्ठा, स्वातंत्र्य, राष्ट्रीय सुरक्षा, या प्रमुख मुद्द्यांवर भाजप काम करत आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत आणि पारदर्शकता हे मुद्दे भाजपच्या अग्रस्थानी राहीले आहेत. लोकशाही राष्ट्र, निष्ठा आणि सत्य आदीं भाजपला पथदर्शक आहेत. या मुद्द्यांमुळेच राष्ट्रवाद आणि सुराज्य येऊ शकते. हेच आमचे ध्येय राहीलेले आहे. सर्व राजकीय पक्षांनी लोकशाहीच्या या उत्सवात इमानदारी आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@