भारतीय नौसेनेचा प्रकल्प ७५ : चीनला आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


नवी दिल्ली : हिंदी महासागरात दबदबा निर्माण करण्यासाठी भारतीय नौसेना आता सज्जा होणार आहे. नौसेनेने आपला महत्वकांशी प्रकल्प ७५ सुरू केला आहे. या अंतर्गत सहा घातक अशा पाणबुड्यांची खरेदी प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे. नौसेनेचा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा प्रकल्प ५० हजार कोटींचा आहे. या अंतर्गत निविदा प्रक्रीयेला सुरुवात करण्यात आली आहे. नौदलाकडून पाणबुडी निर्मिती करणाऱ्या विदेशी कंपन्यांकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

काय आहे प्रकल्प ७५ ?

प्रकल्प ७५ अंतर्गत भारतीय नौसेना डिझेल आणि इलेक्ट्रोनिक सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्याचा नौदलाचा निश्चय आहे. मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये तयार केल्या जाणाऱ्या स्कॉर्पियन क्लास पाणबुड्यांपेक्षा जवळपास दुप्पट मोठ्या असणार आहेत. या पाणबुडीत १२ एएसीएम आणि एएससीएम क्षेपणास्त्र असणार आहे. नौसेनेच्या मागणीनुसार यात पाण्यातून मारा केली जाणारी १८ जास्त वजनाची क्षेपणास्त्र यात अंतर्भूत केली जाणार आहेत.


 
 

हिंदीमहासागरातील सुरक्षा आणि भारताचा दबदबा

हिंदी महासागरात पारंपारीक पाणबुड्या आणि अणवस्त्र क्षेपणास्त्रे या दोहोन्ही सुसज्ज अशा पाणबुड्या या भागात तैनात करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. हिंदी महासागरातील भारताच्या अखत्यारीत असलेल्या जलसीमेची सुरक्षा या ठिकाणाहून केली जाणार आहे.

 

चीनशी दोन हात करण्यासाठी

भारताकडे सध्या शंभरहून अधिक पाणबुड्या युद्धासाठी सुसज्ज आहेत. पाकिस्तानी नौसेनेकडील पाणबुड्यांची संख्या २० आहे. भारताने चीनकडून होणाऱ्या कारवायांविरोधात सुसज्ज होण्यासाठी या पाणबुड्यांची मागणी करण्यात आली आहे. चीनी जहाज बऱ्याचदा हिंदीमहासागर क्षेत्रात टेहळणी करत आहेत. भारतीय जलसीमेपासून चीनला लांब ठेवण्यासाठी या पाणबुड्यांची मोठी मदत होणार आहे.

 

 
 
 

प्रकल्पासाठी समिती तयार

डिफेन्स एक्विझिशन काऊन्सिलमध्ये पाणबुड्यांच्या खरेदीसाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी वरीष्ठ नौसेना अधिकाऱ्याची प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक समिती नेमली जाणार असून या अंतर्गत हे कामकाज पाहीले जाणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@