दिवा स्थानकात महिलांचा रेलरोको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



मुंबई : मुंबईच्या दिवा स्थानकात महिला प्रवाशांनी सकाळीच लोकल रोखून धरली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त महिलांनी रेल रोको केला. यावेळी जवळपास अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता गाड्या ५ ते १० मिनिटाने उशीरा धावत आहेत. त्यामुळे काही वेळासाठी कामावर, कॉलेज व इतर ठिकाणी पोहोचणाऱ्या लोकांना मोठ्या समस्येला सामोर जावे लागले.

 

सकाळी ७.१५ ते ७.३० दरम्यान दरवाजा अडवून धरणाऱ्या महिला प्रवाशांच्या विरोधात महिला रुळावर उतरल्या आहेत. त्यांनी तब्बल १० मिनिटे रेल्वे रोखून ठेवली होती. रेल रोको झाल्याचेदिवा स्थानकातील पोलिसांना समजताच पोलिसांनी महिलांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला पोलीस कर्मचारी कमी प्रमाणात असल्यामुळे रेल रोको झाला. यानंतर महिलांनी फलाटावर येऊन आपला पुढील प्रवास गर्दीतून केला. यामुळे या रेल रोकोचा फटका सकाळीच मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बसला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@