यामुळे जयाप्रदा झाल्या भरसभेत भावुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. भाजप उमेदवार जयाप्रदा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर एकेकाळच्या अभिनेत्री आणि सध्याच्या भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांनी एका जाहीर सभेत भाषणही केले. यावेळी, जुन्या आठवणींनी त्यांना भावूक केले, इतकंच नाही तर त्यांना आपले अश्रूही आवरणे कठीण झाले.

 

"मला रामपूर सोडायचे नव्हते. कारण इथे चांगले काम करणाऱ्या गरीब लोकांना दाबले जाते" असे यावेळी भाजप उमेद्वार जयाप्रदा यांनी सांगितले. आझम खान यांच्यावर निशाणा साधत त्यांनी जे लोक त्यांच्याविरुद्ध काम करत होते त्यांना तुरुंगात टाकले जात होते. मी सक्रीय राजकारणापासून आणि रामपूर सोडून गेले कारण माझ्यावर ऍसिड हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. माझ्यावर हल्लाही करण्यात आला" असे आरोप करत असतानाच त्या भावुक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@