इस्रो ५ लष्करी उपग्रह सोडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या वर्षात पाच लष्करी उपग्रह अंतराळात पाठवण्याच्या तयारीत आहे. इस्रो नव्या मालिकेतील चार रिसॅट उपग्रह आणि एक अ‍ॅडव्हान्स कार्टोसॅट-३ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोकडून दिली. याची तयारीही सुरु झाली असून नुकतेच दोन टेहळणी उपग्रह अवकाशात सोडून या कार्यक्रमाचा इस्रोने शुभारंभ केला आहे. या उपग्रहांमुळे सुरक्षा रक्षकांची निरिक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. त्यासाठी आणखी अत्याधुनिक सैन्य उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.

 

या उपग्रहांमुळे काय फायदा होणार?

 

> या उपग्रहांमुळे अंतराळात भारताचे लष्करी सामर्थ्य वाढणार आहे.

> या उपग्रहांमुळे सुरक्षा रक्षकांच्या निरिक्षण क्षमतेत वाढ होणार आहे.

> हे उपग्रह भारतीय सैन्यासाठी मोलाची कामगिरी बजावू शकतात.

 

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे की, "आम्ही यंदा उपग्रह आणि रॉकेट्स मिळून ३३ मोहिमा पार पाडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जुलैमध्ये रिसॅट - २ बीआर १, ऑक्टोबरमध्ये रिसॅट-२ बीआर २, नोव्हेंबरमध्ये रिसॅट - २बी लॉन्च करण्यात येणार आहे. रिसॅट - २बी मालिका ही गुप्त उपग्रहांचे सूक्ष्म स्वरुप आहे. यामध्ये एक्स-बँड सिंथेटिक अपर्चर रडार बसवण्यात आले आहेत. हे रडार ढगांच्या पलिकडीलही छायाचित्रे घेऊ शकतात. तसेच या छायाचित्रांना १ मीटर रिझॉल्युशनपर्यंत झूम करु शकतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@