चेन्नईविरुद्ध जिंकत मुंबईने मिळवला 'हा' मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



मुंबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये बुधवारी संध्याकाळी रंगलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.

 

२००८मध्ये आयपीएलला सुरुवात झाली. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १७५ सामने खेळले आहेत. यापैकी १०० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ७५ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिंकलेल्या १०० पैकी १ सामना मुंबईने सुपरओव्हरमध्ये जिंकला आहे. आतापर्यंत मुंबईने दोनदा आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे.

 

वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ३७ धावांनी विजय मिळविला. मुंबई इंडियन्सने चेन्नईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. सूर्यकुमार यादव याच्या (५९ धावा) अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने २० षटकात ५ बाद १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकात ८ बाद १३३ धावा करता आल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@