चित्रपटापासून आम्ही लांबच : भाजप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



चित्रपटावर बंदी घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी : भाजप

 

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात पीएम मोदी हा नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर अनेक वाद निर्माण केले आहेत. अशामध्ये हा चित्रपट आचारसंहितेचे उल्लंघन करत असून निवडणुकीनंतर प्रदर्शित करावा यासाठी न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. " आमचा या चित्रपटापासून आम्ही लांबच आहोत. यात आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात येत आहे. तसेच, अशाप्रकारे एखाद्या चित्रपटावर बंदी घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचेही सांगण्यात आले.

 

देशातील आगामी लोकसभा निवडणूक काळात 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका वकील अमन पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ८ एप्रिलला सुनावणी होणार आहे. यापूर्वीदेखील या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. मात्र, ती याचिकादेखील फेटाळून लावण्यात आली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@