अंमली पदार्थ बाळगल्याने नेस वाडिया अडचणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |


 

 

टोकियो : भारतात अब्जाधीश घराण्यातील एक वाडीया ग्रुपचे उत्तराधिकारी नेस वाडीया यांना अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेसजवळ २५ मार्च रोजी अंमली पदार्थ आढळले होते. प्रकरण गेले काही दिवस न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान या प्रकरणी आता त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या वृत्तानंतर वाडीया ग्रुप ऑफ कंपनीच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली आहे. यात बॉम्बे डाईंग आणि बॉम्बे बर्मा आदी शेअरचा सामावेश आहे.

 

वाडिया ग्रुपचे स्पष्टीकरण

या प्रकरणी आता वाडीया ग्रुपने एक प्रतिक्रीया जाहीर केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हे एक प्रलंबित प्रकरण आहे. त्यामुळे वाडिया भारतात असल्याने त्यांना कंपनीत कोणत्याही जबाबदारीतून मुक्त केले जाणार नाही. वाडीया आत्तापर्यंत ज्या जबाबदाऱ्या पार पाडत आले आहे, त्या पदांवर ते कायम राहणार आहेत.

 

जपानच्या होक्काइडो द्विप येथील न्यू चिटोसे विमानतळावर नेस वाडीया यांच्याकडे २५ ग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. २०१४ मध्ये प्रेयसी प्रिती झिंटानेही त्यांच्याविरोधात गैरवर्तन केल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

 

कोण आहेत नेस वाडीया ?

वाडीया समुहाच्या मालकीच्या बऱ्याच कंपन्या आहेत. त्यापैकी बॉम्बे डाईंग, बॉम्बे बर्मन ट्रेडिंग, ब्रिटानिया बिस्कीट, गो एअरलाईन्स आदी कंपन्या आहेत. त्यांचे एकूण बाजारमुल्य १३.१ अब्ज डॉलर्स इतके आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@