येस बॅंकेचा शेअर घसरला : १५ हजार कोटींचा चुराडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |




मुंबई : मार्च २०१९ चे तिमाहीतील असमाधानकारक निकाल आल्याने अनेक गुंतवणूकदारांनी पतमानांकन घटवल्याने मंगळवारी येस बॅंकेचा शेअर ३० टक्क्यांनी घसरला. यामुळे बॅंकेचे बाजारमुल्य १५ हजार कोटींनी घटले. दिवसअखेर तो ७० रुपयांनी घसरून १६६.७५ रुपयांवर पोहोचला. मात्र, गुंतवणूक कंपनी मॅक्वायरी कॅपिटल सिक्युरीटीजने आपली चुक कबुल केली आहे. येस बॅंकेचा व्यवसाय समजण्यात उणीव राहील्याची कबूली कंपनीने दिली आहे. मॅक्वायरीने कंपनीचे टार्गेट १६५ रुपये केले आहे. मॉर्गन स्टॅनलीनंतर येस बॅंकेसाठी हे दुसरे सर्वात कमी टार्गेट आहे.

 

येस बॅंकेने मार्च तिमाहीचे निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. यात कंपनीला गतवर्षाच्या तुलनेत १ हजार ५०७ कोटींचा तोटा झाला. तिमाहीत नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च २०१८ मध्ये बॅंकेने १ हजार १८० कोटींचा नफा कमावला होता. मार्च तिमाहीत बॅंकेचा एनपीए ३.२२ टक्के झाला आहे. यापूर्वी तो २.१० टक्के होता. बांधकाम समुह आयआयएण्डएफएस आणि जेट एअरवेजला दिलेल्या कर्जाची वसुली न झाल्याने या तिमाहीत प्रोव्हीजनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

येस बॅंकेच्या अध्यक्षपदी रवनीत गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गील बॅंकेच्या कर्जांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मार्च महिन्यातील प्रोव्हिजनिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. मॅक्वायरीनुसार, कर्जांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, किरकोळ व्यवसाय वाढ आणि औद्योगिक व्यवसाय मॉडेल बदलल्यामुळे येस बॅंकेचा परताव्याचे गुणोत्तर मोठ्या कालावधीसाठी कमी राहण्याची शक्यता आहे. याआधारे येस बॅंकेच्या प्रतिशेअर नफ्यात ४५ टक्क्यांनी कपात केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@