“दिव्य विवाहम्”: एक्सप्रिमेंटल थिएटर येथे दैवी विवाह प्रथांच्या पवित्रतेचा उत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |


 

मुंबई: ५० व्या वर्षामध्ये नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आणि डॉ. उषा आर.के. सादर करीत आहेत, “दिव्य विवाह- विवाहाच्या प्रथांचा आनंद साजरा करणारा नृत्य महोत्सवया कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक २ मे २०१९ रोजी एक्सप्रिमेंटल थिएटर, एनसीपीए येथे होणार आहे.


 

डॉ. उषा आर.के., प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना, कला सल्लागार आणि समीक्षक तसेच सांस्कृतिक मंत्रालयाच्या माजी सदस्य सचिव असून त्यांनी दिव्य विवाहाची कल्पना साकारली आहे, या कार्यक्रमामध्ये उशीरा दुर्लक्षित करण्यात आलेल्या हिंदू विवाह प्रथांना साजरी करण्यात येणार आहे. लीव्ह इन नातेसंबंध ग्राह्य होत असलेल्या समाजामध्ये लग्न म्हणजे विस्तारीत जवाबदाऱ्यांचा अतिरिक्त बोजा बनून राहिले आहे, डॉ. उषा या संस्काराच्या पवित्रतेच्या भव्य स्वरुपाला आपल्या समोर सादर करणार आहेत.


 

या नृत्य सोहळ्यामध्ये रती आणि मन्मथ, पावर्ती आणि शिव, सीता आणि राम, रुक्मिणी आणि कृष्ण, द्रौपदी आणि अर्जून, वल्ली आणि कार्थिकेय यांच्यासारख्या दैवी जोड्यांच्या कथांमार्फत कुटुंब परंपरेचे अधिकाधिक जतन करणाऱ्या प्रथांचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यांनी प्रत्येक भागामध्ये या दैवी जोड्यांच्या पात्रांमार्फत महत्वाच्या प्रथांचे चित्रीकरण केले आहे, ज्यामुळे दोन जीवनांच्या बंधनाचे महत्त्व आणि सखोलतेवर जास्त भर देण्यात आला आहे. अधोरेखीत केलेल्या काही प्रथांमध्ये हळद, कन्यादान, मांगल्य धारणा, जयमाला घालणे, सप्तपदी, नालंगू किंआ जोडप्याला उत्साहामध्ये व्यस्त ठेवणाऱ्या कृतींचा समावेश आहे.

नृत्य युगूल या पात्रांचा परिचय करुन देण्यासाठी भरतनाट्यमच्या नृत्यप्रकारांचा उपयोग करणार असून , सर्व प्रथा, लग्नसोहळा सादर केला जाणार आहे आणि अंतिम टप्प्यात परिणय झालेल्या जोडप्यांची आरती केली जाईल.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@