महेश भट यांच्या मार्कशीटमध्ये इम्रान झाहीदचे पदार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |



इम्रान झाहीद हा नवीन कलाकार 'मार्कशीट' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. इम्रान खान या भूमिकेमध्ये बिहारमधील छोट्याश्या गावातील महाविद्यालयीन मुलगा आहे. ज्याचा भारतातील अतिशय नावाजलेल्या शिक्षण संस्थांमधील घोटाळ्यांमुळे शिक्षण संस्थेवरचा विश्वासच उडाला आहे. आता असे कशामुळे झाले
? नक्की काय घोटाळे झाले ? हे कदाचित आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल.

 
सध्या भारतात चित्रपटांमधून नवनवीन विषय हाताळले जात आहेत. दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक महेश भट यांचा एक नवीन चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मार्कशीट'. मार्कशीट म्हटले की अशीच आपल्या पोटात गोळा येतो. आता या चित्रपटात याच मार्कशीटवरून होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल भाष्य करण्यात आले आहे अशी शक्यता आहे.


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@