इसिसचा क्रूरकर्मा अबू बक्र अल बगदादी जिवंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |



बगदाद : इसिसचा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असल्याच्या पुरावा समोर आला आहे. तब्बल पाच वर्षानंतर बगदादीचा एक कथित व्हिडिओ समोर आल्याने बगदादी अद्याप जिवंत असल्याच्या नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. आपल्या काही साथीदारांसोबत तो जिहाद आणि इतर विषयांवर अरबी भाषेत बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीच आहे याबाबत सत्यता पडताळली जात आहे.

 

पूर्व सीरियासंदर्भात बोलतानाचा बगदादीचा १८ मिनिटांच्या व्हिडीओनंतर त्याची एक ऑडिओ क्लीपही व्हायरल केली गेली आहे. यात तो श्रीलंकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलत आहे. या पूर्वीही त्याच्या अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्यापासून यात त्याने मुस्लिमांना जिहादसाठी लढण्याचे आवाहन केले होते. मात्र, २०१४ नंतर प्रथमच त्याची व्हिडिओ क्लिप समोर आल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

 

२०१४ साली मोसूलमधील एका मशिदीत भाषण करतानाचा बगदादीचा शेवटचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर २०१५ साली त्याचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र याबाबत कोणताही पुरावा मिळू शकला नव्हता. अखेर पाच वर्षानंतर बगदादीचा नवा व्हिडिओ समोर आल्याने इसिसचा हा क्रूरकर्मा अद्याप जिवंत असल्याचे बोलले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@