समता परिषदेला ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |


पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे (फर्ग्युसन महाविद्यालय) यांच्यावतीने ४० वर्षे सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज पुरस्कार २०१८,’ समता परिषद, मुंबई या संस्थेला डॉ. नेहरू उमराणी (प्र. कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) आणि डॉ. शरद कुंटे (अध्यक्ष परिषद व नियामक मंडळ डे. ए. सोसायटी, पुणे) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना समता परिषदचे अध्यक्ष माजी मंत्री, आ. विजय (भाई) गिरकर (मुख्य प्रतोद, विधान परिषद) आणि सर्व कार्यकर्ते तसेच मार्गदर्शक दादा इदाते (भटक्या विमुक्तांच्या विकास व कल्याण बोर्डचे नवनियुक्त अध्यक्ष तथा नीति आयोगाचे केंद्रीय सदस्य), कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानिटकर, डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या सदस्या योजना ठोकळे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी दादा इदाते म्हणाले की, “समन्वय व सेवा या सूत्रांचा विस्तार केल्यास समरसतेची स्थापना होते. आपल्या देशाच्या खोलवर रूजलेल्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रकटीकरण म्हणजेच समरसता. देश एकात्म करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा मार्ग आपआपल्या काळात शोधणे आवश्यक आहे. त्यानुसार कृती करणे, सामाजिक परिर्वतनासाठी आवश्यक आहे,” तर, “उत्तम शिक्षणातून नीतिमत्ता वाढीबरोबर रोजगार निर्मिती होते. त्यातून समाज परिवर्तन अपेक्षित असते. समाज परिवर्तन होत असताना सेवाभाव आणि समन्वयाची भूमिका महत्त्वाची असते,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. नेहरू उमराणी यांनी व्यक्त केले.

 

समता परिषदेचे संस्थापक भाई गिरकर म्हणाले की, “बहुजन व दलित एकत्र आले, तर समाजाचा विकास होईल, या भावनेतून समता परिषदेचे कार्य सुरू आहे. समन्वय व सेवेच्या माध्यमातून समाज परिर्वतन व समाज जोडण्याचे काम परिषद करते. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. प्र. कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी आणि दादांच्या उपस्थितीत भाई गिरकरांचे कार्यप्रवृत्त करणारे मनोगत आणि मुंबईहून आलेल्या समता परिषदेच्या ५० कार्यकर्त्यांच्या सलक्षणीय सहभागाने छत्रपती राजर्षी शाहू पुरस्कार संस्मरणीय झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@