चैत्र चाहूल तर्फे विनय हर्डीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |



मुंबई : चैत्र चाहूल या संस्थेने नवी आयडिऑलॉजी: कृतिशील उदारमतवाद या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व लेखक विनय हर्डीकर हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दि. ४ मे २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे पार पडणार आहे. हा कार्यक्रम मोफत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या वैचारिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेने केले आहे.


 

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आपण नागरिक आहोत. निधर्मिकता, लोकशाही, घटनेचे सार्वभौमत्व, हिमतीचे उत्पादक अर्थकारण, नव्या जागतिक अर्थव्यवस्थेला संकट न मानता आव्हान मानून उत्पादक कर्तृत्व गाजविण्याचा दृढनिश्चय, संपत्ती निर्माण करणाऱ्यांबद्दल आदर व अभिमान, नैतिक-वैचारिक जाणिवांची कदर आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला किमान सुखी जीवनाची हमी या मुद्द्यांवर एकत्र येण्यासाठी कोणती आयडिऑलॉजी लागेल?, असे चैत्र चाहूल या संस्थेने केलेल्या आवाहनात म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@