पायाभूत क्षेत्रांची कामगिरी उंचावली : मार्च महिन्यात ४.७ टक्के वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |




नवी दिल्ली : आठ प्रमुख पायाभूत सेवा क्षेत्रांचा कामगिरीत सुधारणा झाल्याने मार्च महिन्यात या क्षेत्रांचा विकासदर . टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद आणि सिमेंट उत्पादनात वाढ नोंदवण्यात आली. फेब्रुवारीत आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर . टक्‍के राहिला होता. केंद्र सरकाराच्या आकडेवारीनुसार २०१८-१९ या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असलेल्या आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर . टक्‍के स्थिर राहिला. मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादनात . टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली.

 

ऊर्जा निर्मितीतदेखील . टक्‍क्‍यांची घट झाली आहे. कोळसा उत्पादन मात्र . टक्‍क्‍यांनी वाढले. मार्च २०१८मध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर . टक्के होता. जानेवारी महिन्यात विकासदराने १९ महिन्यांचा तळ गाठला होता. कच्चे तेल आणि रिफायनरी उत्पादनांच्या निराशाजनक कामगिरीने आठ प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनावर परिणाम झाला. एकूण औद्योगिक उत्पादनात आठ प्रमुख क्षेत्रांचे ४१ टक्‍के योगदान आहे. यामुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर परिणाम होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@