जैशच्या मोस्टवॉन्टेड दहशतवाच्या मुसक्या आवळल्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019
Total Views |



निसार अहमद तांत्रे हा सीआरपीएफच्या तळावर झालेल्या हल्याचा मुख्यसूत्रधार


नवी दिल्ली : संयुक्त अरब अमीरातने (यूएई) जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार अहमद तांत्रे असे या जैशच्या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमधील लीथपोरा येथील डिसेंबर २०१७ मध्ये सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते, तर तिन्ही हल्लेखोरांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.

 

राष्ट्रीय तपास यंत्रणा लीथपोरा येथील सीआरपीएफच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास करत होती. यात निसार अहमद तांत्रे याचे नाव उघड झाले होते. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. निसार यूएईत राहत असल्याची माहिती तपास यंत्रणा मिळताच त्याला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. अखेर त्याला यश आले असून निसारला विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले असून त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 
दरम्यान, यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील आरोपी ख्रिश्चियन मिशेल, दीपक तलवार, यासोबतच अब्दुल वाहिद सिद्दिबापा, फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@