वायू प्रदूषणाने भारत आणि चीनमध्ये २५ लाख मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट्स इंस्टिट्यूट आणि इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऐंड इवैलुएशनने दिलेल्या अहवालानुसार २०१७मध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये २५ लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अहवालात सांगितल्यानुसार, घरात तसेच आस्पासपासच्या विषारी वायूंमुळे वायू प्रदूषणामध्ये भर पडत आहे. यामुळेच २०१७ या वर्षात भारतामध्ये १२ लाख लोकांचा जीव गेला आहे. चीनमधीलदेखील एवढेच लोक वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

 

'ग्लोबल एअर २०१९' नावाच्या अहवालानुसार, दक्षिण आशियामध्ये जन्माला आलेल्या मुलांचे वय जगाच्या इतर भागांच्या तुलनेत साडेतीन वर्षांपेक्षा कमी आहे. भारतामध्ये धुम्रपानामुळेदेखील मृत्यू होतात. कुपोषण, मद्यपान आणि शारिरीक निष्क्रियता या समस्यांमुळे जगभरात मृत्यू अधिक होतात. वायू प्रदूषणामध्ये ८२% प्रकरणे अशी आहेत की लोक असुरक्षित रोगांचे बळी ठरतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@