...तर भारतापासून काश्मीर वेगळा होईल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : "३७० कलम रद्द होताच काश्मीरचे भारताशी असलेले नाते संपुष्टात येईल. काश्मीर भारतापासून वेगळा होईल." असे वक्तव्य जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबतच्या विधानावर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

मेहबुबा मुफ्ती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. "जम्मू-काश्मीर ज्या अटींवर भारतात समाविष्ट झाला आहे, त्याच अटी-शर्ती काढून घेतल्या जात असतील तर आम्ही भारताशी असलेले आमचे नाते तोडून टाकू. संविधानातील अनुच्छेद ३७० किंवा ३५ ए हटविल्यास काश्मीर भारतापासून वेगळा होईल." असे त्या म्हणाल्या. दरम्यान, अमित शहा यांनी २०२० पर्यंत काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@