महाराष्ट्रात २९.९४ टक्के मतदानाची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |


 


नाशिक :
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता अत्तापर्यंत २९.९४ % मतदान झाले आहे. आज ९ राज्यातील ७१ मतदारसंघात मतदान होत आहे. निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात भाजप नेत्या पूनम महाजन
, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, हीन गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्याबरोबर राज्यातील १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही काळ इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला मात्र लगेचच इव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि आत्तापर्यंत मतदान सुरळीत सुरु असताना दिसत आहे.

दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भरती पवार, महाआघाडीच्या धनराज महाले आणि माकपचे जिवा पांडू गावित यांच्यात लढत होत आहे. तर नाशिक निवडणुकीत १८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातील लढत महत्वाची असणार आहे. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@