खाकी वर्दीचा मतदारांना 'आधार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |



मुंबई : देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव चालू आहे. यात मतदारांपासून ते नेत्यांपर्यंत प्रत्येकजण आपापली भुमीका बजावत असतात. या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची म्हणजे सुरक्षितेची जबाबदारी भारतीय सैन्यदल व पोलीस दल पार पाडत असतात. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेले भारतीय सैन्यदल व पोलीस दलाचा सर्व भारतीयांना अभिमान असतो. देशातील नागरिकांच्या कोणत्याही समस्येत ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. देशात निवडणुका शांततेत पार पडावे यासाठी ही दले आपली भूमिका पार पाडत आहेत.

 

मुंबई पोलीस, इंडो-तिबेटी सीमा पोलिस आणि सीमा सुरक्षा दल व इतर सुरक्षा दलांनी लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात महत्वाची भूमिका बजावली. मतदानकेंद्रावर आलेल्या वृद्ध व शारीरिक अपंग असणाऱ्या व्यक्तींना मतदानकेंद्रात पोहचण्यासाठी आधार देत मदत केली. तर काही ठिकाणी या सुरक्षा दलांनी नागरिकांना पाणी वाटप करत मतदारांची तहान भागवली.

 

मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी दाखविलेला प्रामाणिकपणा युवा पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच त्यांनी मतदान न करण्याचे कोणतेही कारण न देता मतदान करा आणि लोकशाहीला बळकट बनवा असे आवाहन केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@