मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |




मुंबई
: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार यांनी सोमवारी सकाळी आपले कुटुंबिय पत्नी, मुलगा व मुलीसह रॉकी हिल येथील बालकल्याणी स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. कुमार यांनी रांगेतील मतदारांशी चर्चा करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. या ठिकाणी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार यांनी कुटुंबासह, कोकण विभागाचे राज्य माहिती आयुक्त सुनिल पोरवाल, उपलोकायुक्त शैलेश शर्मा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्नीसह चर्चगेट येथील के.सी. महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिंदे यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. केंद्र प्रमुख व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.






 



राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कुटुंबासह, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. सतीश पवार यांनी पत्नी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी के.सी. कॉलेजच्या मतदान केंद्रावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. कोकण विभागाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी मुलासोबत रिगल सिनेमाजवळील सेंट ॲनिस गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@