मुंबईत दिगज्जांनी लावली मतदानाला हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |



मुंबई : लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि शेवटचा टप्पा मुंबईसह महाराष्ट्र पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. सकाळपासून मतदानासाठी मुंबईकरांमध्ये उत्साह दिसत आहे. सामान्यांसह अनेक दिगज्जांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. अरविंद सावंत, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम, पूनम महाजन, प्रिया दत्त, राजन विचारे, समीर भुजबळ यासारख्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंदिस्त होणार आहे.

 

सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईसह उपनगरांमधील मतदानाची आकडेवारी

 

> उत्तर मुंबई - १९.४६ %

> उत्तर-पश्चिम मुंबई - १७.६४ %

> ईशान्य मुंबई - १८.३९ %

> उत्तर-मध्य मुंबई - १६.२१ %

> दक्षिण-मध्य मुंबई - १६.८० %

> दक्षिण मुंबई - १५.५१ %

 

या दिगज्जनी बजावला आपला मतदानाचा हक्क

 

> शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क

> उद्योगपती अनिल अंबानी यांनी कफ परेड येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

> रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रावर केले मतदान. त्यांनी सामान्यांसह रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला

> ज्येष्ठ संशोधक, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी एलआयसी मंडल ठाणे येथे मतदान केंद्रात बजावला मतदानाचा हक्क

> राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क.

> दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनी मानखुर्द येथे केले मतदान

> टेनिसपटू महेश भूपती यांनी आज पहिले मतदान केले, पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद आहे असे मत त्यांनी व्यक्त केले

> माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मतदान केले. श्वासोश्वास जेवढा महत्वाचा तेवढाच मतदानाचा हक्क महत्वाचा आहे असे मत मनोहर जोशींनी व्यक्त केले. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@