शिवसेना भाजपला दूर ठेवण्यासाठी ती खेळी, शरद पवारांची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2019
Total Views |



मुंबई : २०१४ निवडणुकीत राज्यातील चार प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. भाजपला मोदी लाटेत १२३ जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. निकाल पूर्ण हाती येण्याच्या आत भाजप मोठा पक्ष ठरला होता. तेव्हा शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या मागे शिवसेना आणि भाजपला दूर ठेवण्याचा हेतू होता अशी कबुली खुद्द शरद पवारांनी दिली आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली आहे.

 

तुम्ही भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला त्यावर पवार म्हणाले की, “२०१४ साली आम्ही भाजपला पाठिंबा दिला. त्याचे कारण शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊ नये अशी रणनीती होती. मी भाजपसोबत जाणार नाही हे नक्की.या घटनेबाबत पवार आपले आत्मचरित्र लोक माझे सांगाती मध्ये म्हणातात की, “माझी अशा बाबतीत स्वच्छ आणि सरळ भुमिका असते. आपली बाजू कमकुवत असताना, विरोधकांना आपल्या रणनीतीचा थांगपत्ता न लागल्यामुळे ते चाचपडत असतानाच आपण चार पावलं त्यांच्यापुढे जाऊ शकतो. आपण केलेल्या राजकीय खेळीचा नेमका अर्थ काय, याचं आकलन होण्याआधीच आपण पुढची मजल मारलेली असते.”


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@