इंडोनेशियात मतपत्रिकांमुळे २७२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2019
Total Views |



जकार्ता : इंडोनेशिया येथे एका दिवसात जगातील सर्वात मोठी निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. इंडोनेशिया सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दहा दिवसांपूर्वी झालेल्या निवडणूकीत २७२ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर, १ हजार ८७८ अधिकाऱ्यांवर उपचार सुरू आहे. निवडणूक काळात मतपत्रिकांचा वापरामुळे आलेल्या कामाच्या ताणामुळे कित्येक सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

 

२६ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये १७ एप्रिल रोजी राष्ट्रपती निवडणूकांसह, संसदीय व स्थानिक निवडणूका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे निवडणूक शांततेत पार पडली. यावेळी १९ कोटी ३० लाख मतदारांनी मतदान केले. एकूण ८० टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण आठ लाख मतदार केंद्रांवर प्रत्येक मतदारांना पाच मतपत्रिकांवर शिक्का मारायचा होता. देशभर सुरू असलेल्या या आठ तासांच्या मतदान प्रक्रियेचा ताण निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जाणवला. इतक्या मोठ्याप्रमाणावर मतपत्रिकांची मोजणी केल्याने अनेक कर्मचारी तणावग्रस्त होते.

 

निवडणूक आयोगाचे प्रवक्ता एरिफ प्रियो सुसांतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शनिवारी रात्रीपर्यंत कामाच्या ताणामुळे आजारी पडलेल्या २७२ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ८७८ अन्य कर्मचारी उपचार घेत आहेत. २३ एप्रिल रोजी आरोग्य मंत्रालयाने निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांच्या विशेष देखभालीसाठी एक परिपत्रक जाहीर केले आहे. अर्थ मंत्रालय मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याची घोषणा करण्यावर विचार करत आहे. मृतांचा आकडा वाढत असल्याने सरकारवर प्रचंड टीका होत आहे."

 

राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवापर प्रबोवो सुबिआंतो यांच्या प्रचार अभियानात सहभाग असणाऱ्या अहमत मुनाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रीया योग्य प्रकारे राबवता आली नाही. मतदान अधिकारी व्यवस्थापनात चुकल्याने हा परिणाम झाला आहे. ही प्रक्रिया प्रचंड घाईत झाली आहे." दरम्यान, सुरक्षा मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहे. निवडणूकीतील अंतिम निकाल २२ मे रोजी होणार आहेत. दरम्यान, भारतात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान घ्या अशी मागणी सतत विरोधी पक्षांकडून केली जाते. भारतातील लोकसंख्येचा विचार करता परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@