चुलबुल पांडे इज बॅक...!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |

 

 
दबंग चित्रपटातील चुलबूल पांडे पुन्हा एकदा आपल्या भेटीस येत आहे. दबंग आणि दबंग २ नंतर आता दबंग ३ चे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. दबंग हा चित्रपट त्यामधील ऍक्शन, गाणी आणि डायलॉग्स यासाठी प्रसिद्ध आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित दबंग ३ मध्ये आता काय वेगळेपण असणार आहे हे २० डिसेंबरलाच कळेल. मात्र त्याच दिवशी ब्रम्हास्त्र देखील प्रदर्शित होत असल्याने दोन्ही चित्रपटांच्या प्रेक्षकांची विभागणी होणार असे दिसत आहे.



त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर कोण सरशी करणार
, कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र होणार याचा निकाल लागेलच पण त्याआधी चुलबुल पांडेचे हे नवे पोस्टर जरूर बघा.

दबंग ३ मध्ये सलमान खान
, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, माही गिल आणि व्हिलन म्हणून पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता सुदीप या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@