स्टुडन्ट ऑफ द इयर २ मध्ये आलियाचा कमबॅक :गाण्याची झलक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |

 

 
'स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटातून बी-टाऊनमध्ये पदार्पण केलेली आलिया भट स्टुडन्ट ऑफ द इयर २ मध्ये आपली एंट्री करणार नाही हे शक्य तरी आहे का...!! त्यामुळे टायगर श्रॉफ बरोबर #हुकअपसॉंग मधून आलिया भट आपल्याला स्टुडन्ट ऑफ द इयर २ मध्ये दिसणार आहे. हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित स्टुडन्ट ऑफ द इयर २ च्या
#हुकअपसॉंग ची कोरिओग्राफी सिने सृष्टितील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका फारा खान यांनी केली असून या गाण्याचे शूटिंग चार दिवस मुंबईच्या मेहबूब स्टुडिओ येथे करण्यात आले आहे. हे गाणे म्हणजे चित्रपटाचे ट्रम्प कार्ड असून यामध्ये आलिया टायगर श्रॉफ पेक्षाही चांगला डान्स केला आहे असे सांगण्यात येत अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

एकदम उडत्या चालीचे असल्यामुळे हे गाणे कोणालाही ठेका धरायला लावेल असे सांगण्यात येत आहे. टायगर आणि आलियाची केमेस्ट्री बघण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात ना? आता काहीच दिवसात गाणे प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@