तुम देना साथ हमारा...विनोद खन्ना...!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |


हिंदी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपल्या सर्वांनाच परिचित असलेल्या विनोद खन्ना यांची आज पुण्यतिथी. आपल्या अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपट सृष्टीला बहारदार 
गाण्यांचा देखील नजराणा दिला.




विनोद खन्ना अभिनयात तर तरबेज होतेच मात्र एक उत्तम राजकारणी देखील होते. गुरुदासपूर मतदार संघातून खासदार म्हणून ते २ वेळा निवडून आले. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे देखील त्यांनी काम पहिले त्यानंतर ६ महिन्यातच त्यांच्यावर राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.


१९४६ साली एका सहाय्यक भूमिकेपासून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर मेरे अपने या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे 'अँग्री यंग मॅन' अशी त्यांना ओळख मिळाली. आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. अमर अकबर अँथनी , मेरा गाव मेरा देश, कच्चे धागे, इम्तिहान, मुकद्दर का सिकंदर असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयातून गाजवले. 



१९८२ सालापासून पुढील ५ वर्ष विनोद खन्ना यांनी सिने सृष्टीतून रजा घेतली आणि ते ओशो राजनीशांचे शिष्य झाले. मात्र काहीच वर्षानंतर चित्रपट सृष्टीत पुनरागमन करून इन्साफ आणि सत्यमेव जयते या दोन चित्रपटात त्यांनी काम केले. विनोद खन्ना यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूपश्चात चित्रपट क्षेत्रातील सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. अशा या महान अभिनेत्याला आपण कधीच विसरू शकणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@