विश्वचषक स्पर्धेत 'या' भारतीय पंचाची वर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये खेळाडूंसोबतच पंचदेखील महत्वाची भूमिका निभावतात. विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने २२ पंचांची यादी जाहीर केली असून यावेळी सुंदरम रवी यांची निवड करण्यात आली आहे. विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेले ते एकमेव भारतीय पंच ठरले आहेत. तसेच, तब्बल ११ वर्षांनी एलीट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आलेले सुंदरम रवी हे पहिले भारतीय ठरले. या आधी २००४ मध्ये एस.वेंकटराघवन हे या पॅनेलमध्ये होते. 

 

आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने २२ पंचाची नेमणूक केली. यामध्ये १६ पंच व ६ सामानाधिकारी असणार आहे. अलिम दार, कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, ख्रिस गफॅनी, इयान गोल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, निगेल लोंग, ब्रूस ऑक्सनफोर्ड, सुंदरम रवी, पॉल रेफेल, रॉड टकर, जोएल विल्सन, मायकेल गॉफ, रुचिरा पल्लियागुरुज, पॉल विल्सन हे १६ पंच असतील. तर, ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून, अँडी पायक्रॉफ्ट, जेफ क्रो, रंजन मदुगले, रिची रिचर्डसन हे ६ सामानाधिकारी असतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@