'बघाच तो व्हिडीओ' म्हणत भाजपने केली ठाकरेंची पोलखोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |




मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'ए लाव रे तो व्हिडीओ' नंतर भाजपनेही राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. आज रंगशारदा सभागृहात झालेल्या सभेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची पोलखोल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज्यभर सभा घेत अनेक कथित आरोप केले होते. त्यामुळे आज शेलार यांनी त्यांच्याच भाषेत 'बघाच तो व्हिडीओ' म्हणत 'जशास तसे' उत्तर दिले आहे.

 

नोटाबंदीने देश कसा खड्ड्यात गेला, देशभरात हुकूमशाही सुरु आहे, भाजपच्या विकास कामाच्या जाहिराती कशा चुकीच्या आहेत, मोदींनी केले विकासाचे दावे कसे खोटे आहेत, मोदी जनतेशी खोटे बोलतात असे तथ्यहीन आरोप करत राज ठाकरे यांनी राज्यभर दहा सभा घेतल्या होत्या. हे सगळे आरोप कसे खोटे आहेत, राज ठाकरे जनतेची कशी दिशाभूल करत आहेत, त्यांच्या भाषणांचा व वक्तव्यांचा पाकिस्तान कसा फायदा घेतो आहे याचे शेलारांनी व्हिडीओ दाखवले. यावेळी त्यांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सोशल मीडियावरील अनधिकृत पोस्टच्या आधारे राज ठाकरे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप केला.

 

सोशल मीडियावर राज यांच्या विरोधात काही लिहिल्यास त्यांचे कार्यकर्ते त्या व्यक्तीला घरी जाऊन मारतात. तसेच सोशल मीडियावर अर्वाच्च भाषा वापरतात. त्यामुळे कोण कोणाची मुस्कटदाबी करतो हे राज ठाकरे यांनी शिकवू नये असाही टोला शेलारांनी लगावला. आम्ही मुस्कटदाबी करतो तर राज यांनी एवढ्या सभा कशा काय घेतल्या असाही त्यांनी सवाल उपस्थित केला. यासोबतच नोटाबंदी व पाकिस्तानविषयीचे राज यांचे मुद्दे यावेळी खोडून काढले. दरम्यान, नोटबंदी संबंधित कोणत्याही प्रश्नावर चर्चेसाठी यावे असे आवाहन राज ठाकरेंना यावेळी शेलारांनी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@