निवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात भरगोस वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |



१ जानेवारी २०१९ पासून लागू होणार नवीन वाढ


मुंबई : निवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही नवीन वाढ १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सरकारने राज्याचे अतिरिक्त सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली वेतनवाढ समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ८० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

समितीच्या शिफारशीनुसार निवृत्तीवेतनात ८० ते ८५ वयाच्या निवृत्तीधारकांना १० टक्के, ८५ ते ९० वयाच्या निवृत्तीधारकांना १५ टक्के, ९० ते ९५ वयाच्या निवृत्तीधारकांना २० टक्के, ९५ ते १०० वयाच्या निवृत्तीधारकांना २५ टक्के, १०० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या निवृत्तीधारकांना ५० टक्के मूळ निवृत्ती वेतनात वाढ होणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.

 

ही वाढ शैक्षणिक अनुदानित शिक्षण संस्था, अकृषक विद्यापीठे, संलग्न बिगर सरकारी महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यांना लागू राहील. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ च्या कलम २४८ अन्वये हा निर्णय जिल्हा परिषदांनाही लागू राहणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@