मुस्लिम महिलांनी दिला 'नमो अगेन'चा नारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |



मुंबई : नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी माहिमच्या बाबा मखदूम शाह दर्गावर मुस्लीम महिलांनी शुक्रवारी चादर चढवली. तसेच मोदींच्या विजयासाठी प्रार्थनाही केली. यावरून मुस्लिम समाजातही 'नमो अगेन'चा नारा ऐकायला मिळत आहे. पंतप्रधानपदावर असताना नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाकसारखी प्रथा बंद केली. तसेच, मुस्लिम महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला.

 

"पंतप्रधान मोदी यांनी मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकसारखी वाईट प्रथा बंद करून आत्मसन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच मुस्लीम समाजासाठी मोदी सरकारने खुप कामे केली आहेत. तिहेरी तलाक सारखा कायदा आणला. हे सरकार काम करणारे सरकार आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडून यावे, यासाठी आज मुस्लीम महिलांनी माहिम दर्गा येथे दुआ केली." अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे हाजी एस आझाम यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@