महेश मांजरेकरांचा बिग बॉस मराठीमधील मराठमोळा अंदाज !!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |


मुंबई : काही दिवसांपुर्वीच बिग बॉस मराठीच्या सीझन २ च्या प्रोमोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले. आता लवकरच कार्यक्रमाचा अजून एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या प्रोमोमध्ये त्यांचा अस्सल मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांचा फेटा, कुर्ता असा लुक दिसणार आहे. प्रोमो एका चित्रपटामधील क्लिप सारखा दिसत आहे ज्यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे. हे वाचल्यावर, कोणी या कलेशी संबधीत व्यक्ती तर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नाही ना ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो. 

 
बिग बॉस हा कार्यक्रम नेहेमीच त्याच्या एका अनोख्या अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. वाद, भांडण, हेवे दावे, टास्कमध्ये होणारी ओढाताण आणि काही भावनिक क्षण या सगळ्या गोष्टी आपल्याला या एकाच कार्यक्रमात पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही वाट पाहत असलेला बिग बॉसचा पुढील सिझन लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या तरी आज महेश मांजरेकरांच्या या अनोख्या मराठमोळ्या अंदाजाचे देखील कौतुक होताना दिसत आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@