नीरव मोदीचा जामीन फेटाळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |



 

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये सुमारे १४ हजार कोटींचा गैरव्यवहार करून पसार झालेल्या नीरव मोदीला युकेतील न्यायालयात मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट न्यायालयाने फरार नीरव मोदीचा जामिन फेटाळून लावला आहे.

 

नीरव मोदीची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नीरव मोदीने पुन्हा जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. सुनावणी संपल्यावर नीरव मोदीला २४ मेपर्यंत तुरुंगात पाठवले आहे. आता पुढील सुनावणी ३० मे रोजी होणार आहे. त्यामुळे नीरव मोदीला आता सहा आठवडे तुरुंगात राहावे लागणार आहे. या आदेशाविरोधात नीरव मोदी पुन्हा न्यायालयात आवाहन देऊ शकतो.

 

आरोपीला धमकावण्याचा आरोप

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या जामीनाला विरोध दर्शवत क्राउन प्रोसिक्युशन सर्विसने (सीपीएस) शुक्रवारी त्याच्यावर आरोपही केला. एका पूर्व कर्मचाऱ्याला नीरव मोदीने धमकावत याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@