अभिजीत मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |





वाराणसी : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या वाराणसी मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ११.३० वाजता आपला लोकसभा २०१९ निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. सकाळी ११.२० वाजता मोदी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी मेगा रोड शो आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र मोदींनी आपला ज्योतिषांचा सल्ला घेत अभिजीत मूहूर्तावर आपला अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधानपदावर असताना ते पहिल्यांदाच निवडणूकीसाठी अर्ज भरत आहेत. यापूर्वी त्यांनी अर्ज भरताना ज्योतिषांचा सल्ला घेतला नव्हता मात्र, आज त्यांनी अभिजीत मुहूर्तावर अर्ज भरला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी वाराणसीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेला दंडाधकारी बाबा काळभैरवाचे दर्शन घेतले. यावेळी एनडीएच्या घटकपक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जदयु अध्यक्ष नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलचे प्रकाश सिंह बादल, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, यांच्यासह एनडीएतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूकीसाठी वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना या नामांकनासाठी आमंत्रण दिले होते. त्यापूर्वी त्यांनी काशीतील मतदारांना संबोधित केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@