वाराणसी मतदार संघ जिंकणे ही तुमची जबाबदारी : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |




वाराणसी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जदयु अध्यक्ष नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलचे प्रकाश सिंह बादल, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्यासह एनडीएतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूकीसाठी वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना या नामांकनावेळी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. त्यापूर्वी नरेंद्र मोदींनी काशीतील मतदारांना संबोधित केले.

 

नरेंद्र मोदींनी काशीतील मतदारांना संबोधित करताना लोकतंत्र मजबूत करण्याचे आवाहन केले. देशातील प्रत्येक उमेदवार हा कोणत्या पक्षासाठी आहे त्याचा विचार करू नका, त्यांना द्वेष देत बसू नका प्रत्येक उमेदवार लोकशाही मजबूत करण्यासाठी आला आहे. यावेळी महिला मतदारांना मतदानासाठी उतरण्याचे आवाहन केले. प्रत्येक बुथला शंभर पुरुषांमागे १०५ महिला मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

नरेंद्र मोदी म्हणाले, "माझ्या विभागातील प्रत्येकजण हा नरेंद्र मोदी असायला हवा. प्रत्येकाने भाजपला मतदान व्हावे यासाठी आपणहून प्रयत्न करायला हवे. जर मी पक्षाच्या कामासाठी देशाच्या विविध भागात व्यस्त असलो तर तुम्ही माझ्या इथल्या उमेदवारी प्रचार प्रसार करायला हवा. जर इथे माझी हार झाली तर ती हार माझ्या बुथ मधल्या प्रत्येक उमेदवाराची असेल."

 

यावेळी पंतप्रधानपदावर दावा करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, " पंतप्रधानपद हे केवळ कोणत्या एका परिवारासाठी नाही. कोठल्या आई-मुलाच्या किंवा काका-पुतण्याच्या मालकीचे नाही. हे पद देशातील प्रत्येक मतदाराने दिलेली जबाबदारी आहे."


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 

@@AUTHORINFO_V1@@