ड्रॅगन वठणीवर : अरूणाचल प्रदेश, काश्मिर दाखवले भारताच्या नकाशात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश हे राज्य आपल्या देशात दाखवणारा चीन अखेर वठणीवर आला आहे. चीनकडून जाहीर झालेल्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि काश्मिर ही राज्ये भारतात दाखवण्यात आली आहेत. बिजिंगमध्ये बेल्ट एण्ड रोड इनिशिएटीव्ह (बीआरआय) समेटमध्ये प्रदर्शित केलेल्या नकाशात भारतात संपूर्ण काश्मिरसह अरुणाचल प्रदेश दाखवण्यात आला आहे.

या नकाशानुसार भारतालाही बीआरआयचा भाग म्हणून दर्शवण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी भारताने या समिटवर बहिष्कार घातला होता. २०१७ मध्ये बीआरआय समिटमध्ये भारताने सहभाग घेतला नव्हता. जगातील ३७ देश या ठिकाणी सहभागी होतात. बीआरआयच्या नियोजनानुसार, आशिया आणि युरोपला रेल्वे मार्ग, जलमार्ग आणि बंदरांद्वारे जोडण्याचे काम केले जाणार आहे. तीन दिवसीय या समिटचे सुरुवात गुरुवारी झाली आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हा नकाशा प्रदर्शित केला आहे.

 

चीनच्या या खेळीबाबत जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. चीनने अरुणाचल आणि काश्मिर भारतात असलेले असंख्य नकाशे यापूर्वीच नष्ट केले आहेत. भारताला खुश करून चीन काही नवीन योजना आखण्याच्या तयारीत तर नाहीना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


 

नोव्हेंबर २०१८ मध्ये चीनच्या सरकारी चॅनलने पाकिस्तानच्या अधिकृत काश्मिरचा भाग पाकिस्तानपासून वेगळा दाखवला होता. याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडोरवरही पडू शकतो. भारताने पाकव्याप्त काश्मिरमधून जाणाऱ्या कॉरिडोअरला यापूर्वीच विरोध दर्शवला होता. चीनने यापूर्वीच तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीनने काही वर्षांपूर्वी काश्मिरींना थेट स्टॅपल व्हिजा देऊ केला होता. काही हुर्रियत नेत्यांना या कॉरिडोअर संदर्भातील चर्चेसाठी आमंत्रणही दिले होते. भारताने याचा कडाडून विरोध केला होता.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@